पेट्रोल-डिझेलच्या दरात १९ व्या दिवशीही दिलासा, दरवाढ नाही

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिजेलचे नवे दर लागू केले आहेत. गुरुवारी, सलग १९ व्या दिवशीही देशवासियांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल करण्यात आलेले नाहीत. दिल्लीत आज पेट्रोल १०१.८४ आणि डिझेल ८९.८७ रुपये प्रती लिटर दराने विक्री केली जात आहे. यापूर्वी १७ जुलै रोजी इंधन दरात वाढ झाली होती. देशात सद्यस्थितीत पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल उपलब्ध आहे तर राजस्थानमधील श्रीगंगानगरात सर्वात महाग इंधन विक्री केली जात आहे.

कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरियंटचा वाढता धोका दिसत असल्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या बाजारावर दिसून येत आहे. सलग तिसऱ्या दिवशी कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट म्हणजेच डब्ल्यूटीआय क्रूडमध्ये १.२० डॉलरची घसरण होऊन ते ६८.१५ डॉलर प्रती बॅरलवर आले. तर ब्रेंट क्रूड १.१८ डॉलरने कमी होऊन ७०.३८ डॉलरवर आले आहे.

एक ऑगस्ट रोजीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत एक लिटर पेट्रोलवर केंद्र सरकार ३२.९० रुपये आणि राज्य सरकार २३.५० रुपये टॅक्स आकारणी करते. तर डिझेलवर केंद्र सरकार ३१.८० आणि राज्य सरकार १३.१४ टक्के टॅक्स स्वरुपात वसूल करते. याशिवाय वाहतूक खर्च आणि डिलर कमिशन त्याच्याशी जोडले जाते. त्यामुळे ४१.२४ रुपयांचे पेट्रोल दिल्लीत १०१.६२ रुपये होते. २०२० मध्ये कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली. मात्र, केंद्र सरकारने कोरोना महामारीमुळे एक्साईज ड्युटीत वाढ केली. दररोज पेट्रोलियम कंपन्यांकडून दराची निश्चिती केली जाते. सकाळी सहा वाजता इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियमकडून नवे दर लागू केले जातात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here