साखर कारखान्यांना आता येणार “अच्छे दिन”

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

मुंबई : चीनी मंडी

पुणे : दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने ‘साखर परिषद २०-२०’चे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात कोरेगाव पार्क, घोरपडी येथील द वेस्ट इन हॉटेलमध्ये ही साखर परिषद होणार आहे. येत्या ५ ते ७ जुलै दरम्यान ही परिषद होईल, अशी माहिती दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने दिली आहे. या परिषदेला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसेच पुण्याचे खासदार गिरीष बापट आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

साखर उद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्र सहकारी बँकेने कायमच पुढाकार घेतला आहे. नवनवे संकल्प, प्रकल्प राबवून राज्यातील ग्रामीण अर्थकारण मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. बँक आजही साखर कारखान्यांच्या बळकटीसाठी कटिबद्ध आहे. त्यामुळेच साखर कारखाना क्षेत्रातील अडचणी, उपाययोजना, यशस्वी प्रयोगांचे अनुभव, सरकारची आगामी धोरणे, इथेनॉल, सहवीज निर्मिती, गुंतवणूक या विषयांवर चर्चा करण्यासाठी बँकेकडून साखर परिषदेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही परिषद पुण्यात होत आहे. पाच जुलै ते सात जुलै दरम्यान ही परिषद होणार आहे.

परिषदेत साखर आयुक्त शेखर गायकवाड, शुगर ड्रेड असोसिएशनचे प्रफुल्ल विठ्ठलानी, रेणुका शुगर्सचे रवी गुप्ता, कानपूर येथील राष्ट्रीय ऊस संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन, कृषि भूषण संजीव माने यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पाणी व्यवस्थापन या विषयावर जैन इरिगेशनचे अभय जैन तर उसावरील रोग व कीड व्यवस्थापनावर कीटक शास्त्र तज्ज्ञ प्रा. डॉ. पांडुरंग मोहिते मार्गदर्शन करणार आहेत. साखरेचा दर्जा वर प्रत याविषयी ब्रिटानियाचे मनोज बालगी मार्गदर्शन करतील. साखर कारखाना व्यवस्थापनातील आर्थिक शिस्तपालन या विषयावरही तज्ज्ञ साखर संचालक मार्गदर्शन करतील. यासह साखर पणन, साखर व्यवस्थापन, वितरण व्यवस्था, ऊस लागवड वाण आणि उत्पादन, इथेनॉल धोरण आणि उपाययोजना या विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन होणार आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाने परिषदेचा समारोप होणार आहे.

To get all latest updates from this event, follow www.ChiniMandi.com

1 COMMENT

  1. कामगार पगारी व इतर देणी नॅशनलाईज बॅकेतुनच व्‍हावीत आत्‍ता जी कामगार देनी थाबली आहेत ते घडणार नाही कामगार देनी इतर देनी देनेसाठी वापरली जाणार नाहीत ड्‍ॉवल डायरेक्‍ट कामगार खात्‍यावर जमा असावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here