भारतात जादा साखर उत्पानामुळे जागतिक साखर तुट कमी होण्याचे अनुमान

न्यूयॉर्क : भारतातील साखर उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे २०२१-२२ या हंगामातील साखरेच्या पुरवठ्यातील जागतिक कमतरता दूर होण्याची अपेक्षा आहे, असे ब्रोकर स्टोएक्सने (Broker StoneX) म्हटले आहे. याबाबत रॉयटर्सने वृत्त दिले आहे. StoneXने भारतातील २०२१-२२ या हंगामातील साखर उत्पादनाचे अनुमान वाढवून ३३.२ मिलियन टन केले आहे. जानेवारीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या अनुमानापेक्षा ५ टक्के अधिक आहे. त्यामुळे ब्रोकर स्टोनएक्सने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, २०२१-२२ या साखर हंगामात जानेवारीत आढळलेल्या १.९ मिलियन टनाच्या तुलनेत १.१ मिलियन टन अपेक्षित जागतिक साखर तुटवडा राहिल.

International Sugar Organization (ISO)नेही फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत जागतिक पुरवठ्याचा आपला अंदाज घटवला आहे. स्टोनएक्सने म्हटले आहे की, चांगल्या भारतीय उत्पादनामुळे थायलंड आणि चीनमधील समस्या दूर होतील. येथे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. स्टोनएक्सने जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश ब्राझीलसाठी आपले अनुमान जैसे थे ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here