पाम तेलाचा वाद मिटवण्यासाठी मलेशिया भारतातून साखर खरेदी करणार

कुआला लुम्पुर : पाम तेलाच्या निर्यातीत सुरु असलेल्या प्रकरणाला शांत करण्यासाठी मलेशिया भारतातून साखर खरेदीत वाढ करेल, असे मलेशियाच्या साखर उद्योगातील शिखर संस्था असणार्‍या साखर रिफायनरीने सांगितले आहे. तसेच पहिल्या तीन महिन्यात एमएसएम मलेशिया होल्डिंग्ज बेरहड भारतातून 130,000 टन कच्ची साखर खरेदी करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

तसेच कंपनीने 2019 मध्ये भारतातून सुमारे 88,000 टन कच्ची साखर खरेदी केली होती. मलेशिया ने एनआयसी आणि जम्मू काश्मिर शी संबंधित 370 कलामाविरोधात साक्ष दिली होती. यानंतर भारताने कडक कारवाईद्वारे मलेशियातून पाम तेल खरेदी करण्यावर प्रतिबंध घातले होते. ज्याचा परिणाम मलेशियाच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. त्यामुळेच या प्रकरणाला शांत करण्यासाठी मलेशिया भारतातून साखर खरेदी करण्यासाठी पुढे आले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here