देशातील सर्व राज्यांमध्ये इथेनॉल मिश्रण योजनेचा विस्तार

नवी दिल्ली : देशात २०१३-१४ मध्ये सुरू करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी इथेनॉल मिश्रण योजना (ईबीपी) आता देशातील सर्व राज्यांमध्ये पोहोचली आहे. सिक्कीम हे या आठवड्यात ईबीपीमध्ये सहभागी झालेले शेवटचे राज्य ठरले.

एचपीसीईलचे कार्यकारी संचालक सी. श्रीधर गौड यांनी शुक्रवारी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्यावतीने (इस्मा) आयोजित एका वेबीनारमध्ये ही माहिती दिली. भारताने २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गौड यांनी सांगितले की, सद्यस्थितीत आण ७.८९ टक्के इथेनॉल मिश्रणाच्या उद्दीष्टापर्यंत पोहोचलो आहोत. नोव्हेंबरच्याअखेरीस ८.१ ते ८.२ टक्क्यांपर्यंत मिश्रणाचा टप्पा आपण गाठू शकतो.

२०२१-२२ या वर्षासाठी ओएमसींच्यावतीने इथेनॉल खरेजीच्या अंदाजाबाबत गौड म्हणाले, जशा पद्धतीने आपल्या देशातील पेट्रोलची विक्री कोरोना महामारीच्या पूर्व काळापर्यंतच्या स्तरावर आली आहे. इथेनॉलच्या मागणीत आणखी वाढ होऊ शकते. ओएमसी रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून इथेनॉल नेण्याचा पर्याय पाहात आहे. पाईपलाइन आणि रेल्वेच्या टाक्यांचा वापर सुरू करण्यात आला आहे. याशिवाय जहाजांच्या माध्यमातून इथेनॉल वाहतूक करता येईल का याबाबतची विचारविनिमय सरू आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here