देशात उच्चांकी धान्य उत्पादनाचे अनुमान, गहू आणि तांदळाच्या किमती लवकरच घटणार

चालू पिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशातील धान्याच्या उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे. चालू पिक वर्षातील धान्य उत्पादन ३२ कोटी ३५.५ लाख टनाच्या उच्चांकी स्तरावर पोहोचेल अशी शक्यता आहे. धान्याचे उत्पादन वाढण्याचे कारण म्हणजे भात आणि गव्हाचे उच्चांकी उत्पादन होईल. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंगळवारी अशी अपेक्षा व्यक्त केली. कृषी मंत्री म्हणाले की, कृषी संशोधकांच्या कठोर मेहनतीमुळे उच्चांकी उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांदूळ, गव्हाच्या किमती कमी होतील अशी अपेक्षा आहे.

फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चालू पिक वर्ष २०२२-२३ मध्ये गव्हाचे उत्पादन ११ कोटी २१.८ लाख टन होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन ४४ लाख टनाने अधिक असेल. त्यापूर्वी पिक वर्ष २०२०-२१ मध्ये गव्हाचे उत्पादन उच्चांकी झाले होते. तेव्हा गव्हाचे उत्पादन १० कोटी ९५.९ लाख टन झाले होते. काही राज्यांमधील उष्णतेच्या लाटेमुळे गेल्यावर्षी उत्पादनात किरकोळ घट होवून ते १० कोटी ७७.४ लाख टनावर आले. सरकारच्या आकडेवारीनुसार, पिक वर्ष २०२२-२३ मध्ये तांदळाचे उत्पादन १३.०८ कोटी टन राहील अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन १३.६ लाख टन अधिक आहे. चालू पिक वर्षात मोठ्या धान्याचे उत्पादन पाच कोटी २७.२ लाख टन होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन १६.२ लाख टनाने अधिक आहे. डाळींचे उत्पादन दोन कोटी ७८.१ लाख टन होईल. गेल्या वर्षी हे उत्पादन दोन कोटी २.७३ कोटी टन होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here