महागड्या पेट्रोल-डिझेलपासून मिळू शकतो दिलासा

नवी दिल्ली : गेल्या २४ दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. मात्र, तरीही सर्वसामांन्य नागरिक या दरवाढीमुळे हवालदिल झाले आहेत. मंगळवारी देशाच्या राजधानी दिल्लीत पेट्रोल ९१.१७ रुपये लिटर तर डिझेल ८१.४७ रुपये प्रती लिटरवर होते. इंटरनॅशनल मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमती १० टक्क्यांनी घटल्या आहेत. त्यामुळे तेल कंपन्या पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करतील अशी अपेक्षा नागरिकांची आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर युरोपिय देशांत कच्च्या तेलाच्या मागणीत घट झाली आहे. त्याचा परिणाम किंमतीवरही झाला आहे. मागणी घटल्याने एक बॅरल तेलाची किंमत ७१ डॉलरवरून ६४ डॉलरवर आली आहे.
यावर्शी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत पेट्रोल, डिझेलच्या दरात ७.५ रुपयांची वाढ झाली. सातत्याने वाढलेल्या दराचा परिणाम पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवरही झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात पेट्रोलची मागणी ६.५ टक्के तर डिझेलची मागणी ८.५ टक्क्यांनी घटली. देशात पेट्रोल, डिझेलचे दर दररोज बदलत असले तरी याबाबत कोणताही अंदाज वर्तविणे अशक्य आहे.

सरकारची उच्चांकी कमाई
पेट्रोलियम पदार्थांवरील कर सध्या विक्रमी स्तरावर आहेत. केंद्रीतल मोदी सरकारने २०१४-१५ मध्ये एक्साइज ड्युटीमधून पेट्रोलमधून २९,२७९ कोटी रुपये तर डिझेलमधून ४२,८८१ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर चालू आर्थिक वर्षात सुरुवातीच्या दहा महिन्यांत पेट्रोल, डिझेलमधून सरकारची कमाई २.९४ लाख कोटी रुपये झाली आहे. नैसर्गिक वायुवर २०१४-१५ मध्ये सरकारने ७४,१५८ कोटी रुपये कमावले होते. तर एप्रिल २०२० पासून जानेवारी २०२१ पर्यंत सरकारने २.९५ लाख कोटी रुपये कमावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here