अमरावती, आंध्र प्रदेश : शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांसाठीच्या खास डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी सांगितले की, नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत करण्यासाठी बोअरवेलच्या पाण्यापासून भात, ऊस, तंबाखू, सुबाभूळ अशा जादा पाण्याच्या पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
मुख्यमंत्र्यांनी कॅम्प कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बागायती योजनांसह सुक्ष्म सिंचन योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना इनपूट प्रदान करण्यासाठी जगातील सर्वश्रेष्ठ कृषी आणि संशोधन विद्यापीठातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात यावा असे ते म्हणाले. यासोबतच, लांबच्या अंतरावरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार अधिकाऱ्यांनी करावा असे ते म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link