कोल्हापूर, दि. 7 जुलै 2018: देशात आणि राज्यात साखरेचे उत्पन्न अवाढव्य झाले आहे. वाढलेल्या साखरेच्या उत्पादनामुळे साखरेला अपेक्षित दर मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला दर देता येत नाही. पुढील 2019-2020 या गाळप हंगामामध्ये उसाचे जंबो उत्पादन होणार आहे. या उत्पादनाचा तोटा भरून काढण्यासाठी यावर्षी तोट्यातली का असेना पण साखर निर्यात केल्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. देशातून साखर निर्यात करण्यासाठी खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे प्रति क्विंटल साखर दोनशे ते अडीचशे रुपये तोटा सहन करावा लागणार आहे राष्ट्र राज्याचा विचार करता तब्बल 400 ते 450 कोटी रुपयांचा तोटा सहन करून ही साखर निर्यात करावी लागणार असल्याचे चित्र आहे. यावर्षी हा धोका पत्करला नाही, तर पुढच्या वर्षीही साखरेच्या दराचा आणि पर्यायाने ऊस दराचा प्रश्न ही गंभीर होणार आहे. साखरेच्या दरात शंभर-दोनशे रुपयांची वाढ होत आहे, मात्र सध्याची उपलब्ध साखर पाहता वाढलेला दर हा फार काळ टिकून राहील असं वाटत नाही. साखरेचा साठा कमी करणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून साखर निर्यातीला चालना दिली पाहिजे किंबहुना शासनानेही याला पाठबळ दिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिक्विंटल साखरेचे भाव 2200 ते 2300 रुपये पर्यंत आहे तेच देशांतर्गत बाजारपेठेत 2900 3100 रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे तोटा सहन करून साखर निर्यात केली जाणार नाही हे जरी खर असलं तरीही भविष्यातील गाळप हंगामाचे वेध लक्षात घेऊन आतापासूनच साखर निर्यात करावी लागणार आहे.
Recent Posts
Nifty, Sensex down under Tariffs pressure on Friday opening
Mumbai: Persistent tariff pressure and continued selling by foreign portfolio investors (FPIs) dented investor sentiment on Friday, with both benchmark indices opening lower.
The Nifty...
Morning Market Update – 08/08/2025
Yesterday’s closing dated – 07/08/2025
◾London White Sugar #5 (SWV25) – 462.50s (+0.40)
◾NYBOT Raw Sugar #11 (SBV25) – 16.01s (unch)
◾USD/BRL- 5.4236 (-0.0396)
◾USD/INR – 87.551 (+0.133)
◾Corn...
Daily Sugar Market Update By Vizzie – 07/08/2025
ChiniMandi, Mumbai: 7th Aug 2025
Domestic Market
Domestic sugar prices were stable
After rising by Rs 120-150 per quintal over the last 5 to 6 sessions, domestic...
NFCSF चा इथेनॉल मिश्रणाला पाठिंबा, स्वच्छ इंधनासाठी सरकारच्या प्रयत्नांचे केले कौतुक
नवी दिल्ली : NFCSF ने सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे. NFCSF ने म्हटले आहे कि, इथेनॉल मिश्रण कार्यक्रम वैज्ञानिकदृष्ट्या योग्य, पर्यावरणीयदृष्ट्या फायदेशीर...
अमेरिकेकडून करवाढीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या भूमिकेला कृषी शास्त्रज्ञांनी दिला पाठिंबा
नवी दिल्ली : अमेरिकेने भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के शुल्क वाढवण्याची घोषणा केल्यानंतर, ज्येष्ठ कृषी तज्ञ आणि पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण...
शेअर बाजारातील घसरणीला ‘ब्रेक’, सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर बंद
मुंबई : गेल्या दोन सत्रातील घसरण थांबून गुरुवारी शेअर बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये शेवटच्या तासात मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली. अमेरिकन अध्यक्ष...
५०% अमेरिकन टॅरिफ भारतीय व्यापाराला गंभीर नुकसान पोहोचवेल : ट्रेड अँड इंडस्ट्री चेंबर
नवी दिल्ली: चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) ने अमेरिकेच्या अलिकडच्या टॅरिफ वाढीच्या योजनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि असा इशारा दिला आहे की...