साखर निर्याती शिवाय पर्याय नाही

कोल्हापूर, दि. 7 जुलै 2018: देशात आणि राज्यात साखरेचे उत्पन्न अवाढव्य झाले आहे. वाढलेल्या साखरेच्या उत्पादनामुळे साखरेला अपेक्षित दर मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला दर देता येत नाही. पुढील 2019-2020 या गाळप हंगामामध्ये उसाचे जंबो उत्पादन होणार आहे. या उत्पादनाचा तोटा भरून काढण्यासाठी यावर्षी तोट्यातली का असेना पण साखर निर्यात केल्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. देशातून साखर निर्यात करण्यासाठी खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे प्रति क्विंटल साखर दोनशे ते अडीचशे रुपये तोटा सहन करावा लागणार आहे राष्ट्र राज्याचा विचार करता तब्बल 400 ते 450 कोटी रुपयांचा तोटा सहन करून ही साखर निर्यात करावी लागणार असल्याचे चित्र आहे. यावर्षी हा धोका पत्करला नाही, तर पुढच्या वर्षीही साखरेच्या दराचा आणि पर्यायाने ऊस दराचा प्रश्न ही गंभीर होणार आहे. साखरेच्या दरात शंभर-दोनशे रुपयांची वाढ होत आहे, मात्र सध्याची उपलब्ध साखर पाहता वाढलेला दर हा फार काळ टिकून राहील असं वाटत नाही. साखरेचा साठा कमी करणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून साखर निर्यातीला चालना दिली पाहिजे किंबहुना शासनानेही याला पाठबळ दिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिक्विंटल साखरेचे भाव 2200 ते 2300 रुपये पर्यंत आहे तेच देशांतर्गत बाजारपेठेत 2900 3100 रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे तोटा सहन करून साखर निर्यात केली जाणार नाही हे जरी खर असलं तरीही भविष्यातील गाळप हंगामाचे वेध लक्षात घेऊन आतापासूनच साखर निर्यात करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here