इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या broken rice च्या निर्यातीवर निर्बंधांची शक्यता: मीडिया रिपोर्ट

नवी दिल्ली : केंद्र सरकार तुकडा तांदळाच्या (broken rice) निर्यातीवर निर्बंध लागू करू शकते असे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे. या तांदळाचा वापर जनावरांच्या खाद्यासह माणसांकडून खाण्यासाठीही केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून तुकडा तांदळाच्या दरात ३ रुपये प्रती किलोची वाढ होवून त्याचा दर २५ रुपये प्रती किलोवर पोहोचला आहे. तुटलेल्या तांदळाचा वापर बहुतांश करून पोल्ट्री उद्योग आणि इथेनॉल उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून केला जातो.
तुकडा तांदळाची बहुतांश निर्यात चीनला केली जाते. तेथे त्याचा वापर जनावरांना चाऱ्याच्या रुपात केला जातो. तर सेनेगलसारखे आफ्रिकन देश जेवणासाठीही याची आयात करतात.

ऑल इंडिया राईस एक्स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. कृष्ण राव यांनी फायनान्शिअल एक्स्प्रेसला सांगितले की, आम्ही सरसकट निर्बंध लागू करण्याऐवजी तुकडा तांदळाच्या शिपमेंटवर १०-१५ टक्क्यांपर्यंच्या निर्यातीस पसंती देतो. भारत गेल्या दशकभरात जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश म्हणून पुढे आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here