नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत १८.८ टक्क्यांनी वाढली निर्यात

नवी दिल्ली : देशातील निर्यात नोव्हेंबर महिन्यात १८.८ टक्क्यांनी वाढून २०.०१ अब्ज डॉलर झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाकडील सुरुवातीच्या आकडेवारीवरुन ही माहिती मिळाली आहे.

मंत्रालयाने एक ते २१ नोव्हेंबरपर्यंतची आकडेवारी जारी केली आहे. पेट्रोलियम उत्पादने, इंजिनीअरिंग साहित्य, रसायन तसेच रत्ने, आभूषणे या क्षेत्रात चांगली निर्यात झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यात आयातही ४५.३४ टक्क्यांनी वाढून

३५.२२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या समान कालावधीत हा आकडा २४.१५ अब्ज डॉलर होता.

चालू आर्थिक वर्षात निर्यातीने चांगली वाढ घेतली आहे. त्यामुळे ४०० अब्ज डॉलर निर्यातीचे उद्दीष्ट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ऑक्टोबर महिन्यात निर्यातीत ४३ टक्क्यांनी वाढ होवून ती ३५.६५ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. तर त्या महिन्यातील व्यापार तूट १९.७३ अब्ज डॉलर झाली होती.

नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलियम, कॉफी, इंजिनीअरिंग साहित्य, सूती धागे, रत्ने, आभूषणे, रसायन, प्लास्टीक आणि समुद्री उत्पादने यांचा निर्यातीमुध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here