जानेवारीमध्ये निर्यातीत 5.37 टक्क्यांची वाढ

85

नवी दिल्ली : देशाच्या निर्यातीमध्ये जानेवारी महिन्यात वाढ झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या निर्यातीत जानेवारी 2021 मध्ये 5.37 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण निर्यात 27.24 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. या निर्यातीमध्ये फार्मास्युटिकल आणि इंजिनीअरिंग क्षेत्राचे योगदान आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात देशातील आयातीमध्येही वाढ नोंदविण्यात आली आहे. आयात 2 टक्के वाढून 42 अब्ज डॉलर झाली आहे. त्यामुळे या कालावधीतील देशातील व्यापार तूट 14.75 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जानेवारी महिन्यात फार्मास्युटिकल आणि इंजिनीअरिंग क्षेत्रातील निर्यात अनुक्रमे 16.4 टक्के (293 मिलियन डॉलर) आणि 19 टक्के (1.16 बिलियन डॉलर) वाढली आहे.

यापूर्वी डिसेंबर 2020 मध्येही निर्यातीत किरकोळ वाढ दिसून आली होती. डिसेंबर महिन्यात निर्यात 27.15 अब्ज डॉलरवर पोहोचली होती. तर आयात 7.56 टक्क्यांनी वाढून 42.59 अब्ज डॉलरवर गेली. डिसेंबर 2020 मधील व्यापार तूट 15.44 अब्ज डॉलरवर राहिली. जानेवारी महिन्यात व्यापार तुटीत डिसेंबरच्या तुलनेत घसरण दिसून आली आहे.

डिसेंबर 2019 मध्ये निर्यात 27.11 बिलियन डॉलरची होती, तर आयात 39.5 बिलियन डॉलरची राहिली. नोव्हेंबर 2020 मध्ये निर्यातीत 8.74 टक्क्यांची घसरण होती. सध्याच्या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर यादरम्यान, देशातील मालाच्या निर्यातीत 15.8 टक्के घसरण राहिली. ज्याचे मूल्य 200.55 बिलियन डॉलरवर आहे. आधीच्या 2019-20 या वर्षातील याच कालावधीत ही निर्यात 238.27 बिलियन डॉलरची होती.

दुसरीकडे नोव्हेंबरच्या निरयातीमध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत ज्यादा घसरण दिसून आली होती. ऑक्टोबरमध्ये निर्यात ५.१२ टक्क्यांनी कमी झाली होती. मात्र नोव्हेंबरमध्ये ८.७४टक्क्यांच्या घसरणीसह २३.५२ कोटी डॉलरच्या मुल्यासह निर्यात झाली होती. नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलियम प्रॉडक्ट, इंजिनीअरिंचे साहित्य, केमिकल आणइ जेम्स अँड ज्वेलरी यासेक्टरमध्ये जादा घसरण नोंदण्यात आली होती. जगभरात कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या कमी झाल्याने तसेच लसीकरण सुरू असल्याने अर्थव्यवस्थेने वेग पकडला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here