नवी दिल्ली : वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलियम उत्पादने, रत्ने आणि आभूषणे, चामड्याच्या वस्तू, समुद्रातील वस्तूंच्या चांगल्या निर्यामुळे देशातील निर्यात ४८.३४ टक्क्यांनी वाढून ३२.५ अब्ज डॉलर झाली आहे. सलग सातव्या महिन्यात निर्यातीत वाढ झाली आहे. तर व्यापारातील तूट ९.३७ अब्ज डॉलर झाली आहे.
मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जून २०२०मध्ये झालेल्या निर्यात २२ अब्ज डॉलर झाली. तर जून २०१९मध्ये निर्यात २५ अब्ज डॉलर झाली होती. मे २०२१ मध्ये ३२.२७ अब्ज डॉलर निर्यात झाली होती. तर एपरिल महिन्यात ही निर्यात ३१ अब्ज डॉलरवर होती. यासोबतच व्यापारातील तुट ९.३७ अब्ज डॉलर झाली आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यात ०.७९ अब्ज डॉलर झाली आहे. व्यापारी निर्यातीच्या बदल्यात आयात होण्याच्या प्रक्रियेला व्यापार तूट म्हटले जाते.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल – जून ०२१ या काळात निर्यात ८५.८८ टक्क्यांनी वाढून ९५.३९ अब्ज डॉलर झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात आयात वाढून १२६.१५ अब्ज डॉलर झालीआहे. गेल्यावर्षी याच काळातील आयात ६०.४४ अब्ज डॉलर होती. तर तिमाही व्यापार तूट एप्रिल -जून २०२० मध्ये ९.१२ अब्ज डॉलरच्या तुलेत ३०.७५ अब्ज डॉलर झाला आहे. जून २०२१ मध्ये व्यापार तूट मे महिन्याच्या तुलनेत वाढला आहे.
दरम्यान, पहिल्या तिमाहीत निर्यातीमध्ये ५० टक्क्यांची तेजी होण्याची शक्यता आहे. जून २०२१ मध्ये खनिज तेलाची आयात १०.६८ अब्ज डॉलर होती. ती जून २०२० मध्ये ४.९३ अब्ज डॉलर झाली होती. जून महिनयात सोन्याची आयात ६० टक्क्यांनी वाढून ९७ कोटी डॉलर झाली आहे. निर्यातदार कंपन्यांची संघटना फियोचे अध्यक्ष शक्तिवेल यांनी सांगितले की, आजच्या काळात आर-ओडीटीईपी योजना त्वरीत लागू करण्याची गरज आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link