चालू आर्थिक वर्षात ६५० अब्ज डॉलरच्या निर्यातीचे उद्दीष्ट गाठणे शक्य : गोयल

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवांतून एकूण ६५० अब्ज डॉलर संयुक्त निर्यातीचे उद्दीष्ट पूर्ती करणे शक्य आहे, असे वाणिज्य तथा उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी निर्यातदारांच्या गटाला पूर्ण पाठबळ देण्याचे आश्वासन देताना सांगितले.

गोयल यांनी निर्यात संवर्धन परिषदेसोबत (ईपीसी) आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत सांगितले की, चालू महिन्यात १५ जानेवारीपर्यंत निर्यातीचा आकडा १६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे.

गोयल यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात ६५० अब्ज डॉलरच्या निर्यातीचे उद्दीष्ट गाठणे शक्य आहे. ते म्हणाले, उत्पादनांच्या निर्यातीची आकडेवारी ४०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सेवा क्षेत्रातील निर्यातही २५० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणे अपेक्षित आहे.

गोयल यांनी निर्यात संवर्धन परिषदेत निर्यातदारांना आश्वस्त केले. ते म्हमाले, पुढील आर्थिक वर्षात उच्च निर्यात उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सरकार निश्चित पाठबळ देईल. निर्यातीदरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here