आयकर रिटर्न भरण्याच्या मुदतीमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत वाढ

70

नवी दिल्ली : कोरोना महामारीची दुसरी लाट आणि देशातील सद्यस्थिती पाहता केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने आयकरदात्यांना दिलासा दिला आहे. सीबीडीटीने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये आयकर रिटर्न भरण्याची मुदत २ महिने वाढवून ३० सप्टेंबर केली आहे. आयकर विभागाने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली.

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सीबीडीटीने टॅक ऑडिट अॅसेससाठी आयटीआर फाइल करण्याती मुदत ३१ ऑक्टोबर २०२१ वरून वाढवून ३० नोव्हेंबर २०२१ केली आहे. तर बोर्डाने टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्याची अंतीम मुदतही ३० सप्टेंबरऐवजी ३१ ऑक्टोबर केली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने सुधारित आयकर रिटर्न दाखल करण्याची मुदतही ३१ डिसेंबरऐवजी ३१ जानेवारी २०२२ केली आहे. यासोबतच प्रायसिंग स्टडी रिपोर्ट पाठविण्याची मुदत ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे. याशिवाय एसएफटीसाठी आता ३० जून २०२१ ही मुदत असेल.

रिपोर्टेबल अकाउंट स्टेटमेंट सादर करण्याची मुदतही ३१ मेऐवजी ३० जून असेल. आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीसाठी टीडीएस स्टेटमेंट जमा करण्याची अंतिम मुदत ३१मेऐवजी ३० जून करण्यात आली आहे. याशिवाय सीबीडीटीने कर्मचाऱ्यांसाठी फॉर्म १६ जारी करण्याची मुदतही १५ जूनऐवजी १५ जुलै केली आहे. ज्या अकाउंटच्या ऑडिटची गरज नाही मात्र, आयटीआर १ अथवा आयटीआर ४ चा वापर केला जातो, अशांना ३१ जुलैपर्यंत आयटीआर दाखल करावा लागतो. ही मुदतही कोरोनामुळे वाढवली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here