विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून उशीरा येणाऱ्या उसाला जादा दर : अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं. १ पिंपळनेर व युनिट नं. २ करकंब कारखान्याने १६ जानेवारीपासून गाळपास येणाऱ्या ऊसास जादा दर दिला जाणार आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी ही माहिती दिली. कारखान्याने ११ ते १५ जानेवारीदरम्यान गळितास आलेल्या या पाच दिवसांचे प्रती टन २,७०० रुपयांप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार शिंदे यांनी सांगितले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर व करकंब या युनिटनी आजअखेर १३ लाख ६६ हजार ५८८ मे. टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याने आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिलापोटी २२ कोटी ५० लाख बँकेत जमा केले आहेत. आता १६ ते ३१ जानेवारी या कालावधीत गाळपास येणाऱ्या सर्व उसाला प्रती टन २,७५० रुपये दर मिळेल. तर १ ते २८ फेब्रुवारी यांदरम्यानच्या उसाला २८०० रुपये आणि एक मार्चनंतरच्या उसाला २८५० रुपये दर मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here