पुरात बुडाले चेन्नई, तामीळनाडू-आंध्र प्रदेशातही मुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने १० आणि ११ नोव्हेंबर रोजी तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे रस्ते आणि सखल भाग जलमय होऊ शकतो. काही नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेन्नईतील सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील २४ तासात दक्षिण-पूर्व बंगालच्या खाडीवर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितले की, हा हवेचा दाब पश्चिम-उत्तर पश्चिम दिशेला सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही चक्रीय स्थिती ११ नोव्हेंबर रोजी सकाळी तामीळनाडूच्या उत्तर किनाऱ्यावर पोहोचू शकते. याच्या प्रभावामुळे ९ नोव्हेंबरपासून तामीळनाडूत जोरदार पाऊस कोसळू शकतो. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका बसेल. १० आणि ११ नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाचा अलर्ट आधीच देण्यात आला आहे.

पुढील चार दिवसांसाठी दक्षिण-पश्चिम आणि त्यालगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या खाडी आणि दक्षिण आंध्र प्रदेश, तामीळनाडूच्या किनाऱ्यावर तसेच मन्नारच्या खाडीत याचे परिणाम दिसू शकतात. ६० किलोमीटर प्रती तास वेगाने वाहणाऱ्या हवेसह पावसाचे अनुमान हवामान विभागाने वर्तवले आहे. पुढील दोन दिवस दक्षिणपूर्व बंगालच्या खाडीत अशीच स्थिती कायम राहू शकते असे आयएमडीने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here