कारखान्यांनी ऊस बिले थकवली, शेतकरी वळले खांडसरी उद्योगाकडे

57

लखीमपूर-खीरी : गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊस बिले देण्यात सुरू असलेल्या मनमानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऊसाचे पैसे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली आहेत. आता कारखान्यांकडे आठशे कोटी रुपयांहून अधिक बिले थकीत आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात खांडसरी उद्योगाने गती घेतली आहे. यावर्षी जिल्ह्यात तीन नवीन क्रशर सुरू झाले आहेत. येथे शेतकऱ्यांच्या उसाला प्रती क्विंटल २६० ते २८० रुपये दर मिळत आहे.

जिल्ह्यात नऊ कारखाने आहेत. यातील अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले थकवल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. दुसरीकडे सरकारने खांडसरी उद्योगांना प्रोत्साहन दिला आहे. परवान्यासह सरकारी प्रक्रियेत सवलती दिल्या आहेत. तीन वर्षापूर्वी जिल्ह्यात १८ क्रशर होते. गेल्यावर्षी त्यांची संख्या २१ झाली. यावर्षी यात आणखी तीनची भर पडली आहे. यापैकी एक क्रशर सुरू झाले आहे. तर एकाची सुरुवात एक डिसेंबरपासून होईल. जिल्हा खांडसरी अधिकारी सी. एम. उपाध्याय यांनी जिल्ह्यात हा उद्योग विस्तारत असल्याची माहिती दिली. बंगलहा परिसरातील नव्या क्रशरची गाळप क्षमता प्रती दिन १५ हजार क्विंटल आहे. सध्या शेतकऱ्यांना रोख २६० ते २८० रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे त्यांची साखर कारखान्यांशी स्पर्धा होण्याची शक्यता आहे. हंगामात २७ क्रशर सुरू राहतील असे उपाध्याय म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here