कारखान्यांचा साखर निर्यातीवर जोर

नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारपेठेतील विक्रीच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय स्तरावर दर वधारल्याने भारतातील व्यापाऱ्यांनी साखर निर्यातीवर जोर दिला आहे. याशिवाय ब्राझिल, थायलंड या देशांतील उत्पादनात होणाऱ्या घसरणीची शक्यता तसेच कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे निर्यातीच्या संधी वाढल्या आहेत.

साखर निर्यातदारांना सरकारकडून निर्धारित ३१ रुपये प्रतिकिलोच्या किमान विक्री दरापेक्षा प्रति किलो १ ते २ रुपये जादा मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या साखरेच्या वायदा बाजारातील किंमतींनी फेब्रुवारी महिन्यात गेल्या चार वर्षांतील उच्चांक गाठला आहे.

प्रसारमाध्यमांतील माहितीनुसार, साखर कारखान्यांना कच्च्या साखरेसाठी एक्स मील किंमत २४.५० ते २५ रुपये प्रति किलो मिळत आहे. याशिवाय ६ रुपयांचे अनुदान स्वतंत्र मिळते. कच्च्या साखरेच्या निर्यातीचा दर ३२ रुपये प्रतिकिलोपर्यंत आला आहे. केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात आपल्या साखर निर्यात धोरणाची घोषणा केली होती. सरकारने ६ मिलियन टन साखर निर्यातीचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. साखर कारखानानिहाय कोटा मंजूर केला आहे. भारतीय साखरेचा चांगली मागणी आहे. मात्र कंटेनरच्या कमरतरेमुळे याचा निर्यातीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here