थकीत ऊस बिलांबाबत कारखान्यांना पुन्हा इशारा

72

शामली : थकीत ऊस बिलांबाबत प्रशासनाने सातत्याने इशारे देऊनही जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर कोणताच परिणाम झालेला दिसून येत नाही. अनेकवेळा बजावूनही ऊस बिले देण्याची गती संथ आहे. जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी सभागृहात जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी २०२०-२१ या हंगामातील थकबाकीचा आढावा घेण्यात आला. थकबाकी असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ऊस बिले देण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला.

जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे. गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये शामली कारखान्याकडून ३६६.४६ कोटी रुपयांपैकी २६९.२५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. ऊन कारखान्याने ३३७.१० कोटी रुपयापैकी २७१.१७ कोटी रुपये आणि थानाभवन कारखान्याने ४३९.४० कोटी रुपयांपैकी २५५.५३ कोटी रुपये दिले आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांचे अद्याप ३४७ कोटी रुपये थकीत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना तातडीने पैसे देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर शेतकऱ्यांना पैसे देण्यास उशीर झाला तर कारवाई करू असे बजावण्यात आले आहे. बैठकीला शामली कारखान्याचे ऊस महाप्रबंधक कुलदीप पिलानिया, अकाउंट हेड विजित जैन, थानाभवन कारखान्याचे युनिट हेड वीरपाल सिंह, ऊस महाप्रबंधक जे. बी. तोमर, ऊन कारखान्याचे महाप्रबंधक अनिल कुमार अहवालत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here