अलीगडमध्ये पाच हजार क्विंटल ऊस गाळपानंतर कारखाना बंद

अलीगड : दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च करूनही साथा साखर कारखान्याचे गळीत हंगाम योग्य पद्धतीने सरू नाही. दोन दिवसांपूर्वी कारखाना सुरू केला होता. पाच हजार क्विंटल ऊस गाळप करुन कारखाना बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सेल्वा कुमारी जे यांनी कारखान्याचे निरीक्षण करून कारखाना सुरळीत चालवावा असे सांगितले. शेतकऱ्यांना थांबण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याची सुचनाही त्यांनी केली.

साथा कारखान्याच्या दुरुस्तीवर गेल्यावर्षी ८५ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यानंतरही कारखाना सुरळीत झालेला नाही. अलिगडमध्ये विकासकामांचे भूमीपुजन व लोकार्पण करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नव्या कारखान्याची घोषणा केली होती. त्यामुळे शेतकरी आनंदित झाले. मात्र, जो ऊस शिल्लक राहीला याची चिंताही त्यांच्यासमोर आहे. कारखान्याने पाच हजार क्विंटल गाळप केले. जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याला भेट देऊन मशीनरीची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सर व्यवस्थापक रामशंकर यांना सूचना केली. जिल्हा ऊस अधिकारी सुभाष यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. यावेळी अर्थ विभागाचे उप जिल्हाधिकारी विधान जायसवाल, संजीव ओझा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here