कर्जमाफीची मुदत वाढवावी: देवेंद्र फडणवीस

111

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीची मुदत सप्ेटंबर 2019 पर्यंतच्या कर्जासाठी असल्याने त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली गेली असून त्यांना दिलासा देण्यासठी कर्जमाफीसाठीची मुदत वाढवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच ते म्हणाले, कर्जमाफी ही पुढच्या काळासाठी कधी होत नसली तरी आमच्या महायुती सरकारच्या काळात कोल्हापूर, सांगली या भागासाठी पुरामुळे ती करण्यात आली होती.

शेतकर्‍यांचे नुकसान, कर्जमाफीची घोषणा व तरीही शेतकर्‍यांच्या सुरू असलेल्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार व कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती यावर विरोधी पक्षांनी चर्चा उपस्थित केली होती. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. सर्व पक्षांचे नेते बांधावर गेले आणि त्यांनी धीर दिला. उद्धव ठाकरेही त्यावेळी बांधावर गेले होते. त्यांनी कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी हेक्टरी 25 हजार रुपये आणि बागायतीसाठी हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यावेळी विरोधी पक्षात होते. त्यांनीही कोरडवाहूसाठी एक लाख रुपये आणि बागायतीसाठी दीड लाख रुपये मदतीची मागणी केली होती. मात्र, आता दोघे सरकारमध्ये असूनही शेतकर्‍यांना तेवढी मदत मिळालेली नाही, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here