सुरेश कबाडे यांनी एका एकरात घेतले 130 टन ऊसाचे उत्पादन

नवेखेडे : येथील कारंदवाडी येथे सुरेश कबाडे नावाच्या शेतकर्‍याने एक एकर क्षेत्रात तब्बल 130 टन ऊसाचे पीक घेतले आहे. 2018 मध्ये साडेसात फूट सरीमध्ये दीड फूटावर एक या पद्धतीने को 86032 या वाणाची लागवड केली. रोपे सेट करण्यासाठी फुलविक, अमिनो, सिव्हिडी त्यानंतर 30,60 व 90 दिवसांनी सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या तीन फवारण्या केल्या. यामुळे ऊस जेव्हा गळीतास गेला तेव्हा सुमारे दोनएकर तीस गुंठे क्षेत्रामध्ये 358.432 मेट्रीक टनउत्पादन मिळाले , अर्थात एकरी सुमारे 130 टन उत्पन्न मिळाले.

याबाबत बोलताना सुरेश कबाडे म्हणाले, त्यांचा ऊस ठिबक सिंचन वरती आहे. मोठ्या बांधणीपर्यंत एक , तर मोठ्या बांधणीनंतर सरीच्या दोन्ही बाजूला लॅटरल पद्धतीने पाईप टाकून घेतल्या. ऊसाची सरासरी उंची बावीस तेवीस फूट होती. वाडे सोडून 52 ते 54 कांड्या झाल्या . गवताळ वाढ काढून टाकली. रासायनिक लागवडीचा प्रत्येक डोस देताना माती आड जमिनीत भरपूर ओल असताना फवारणी व आळवणी यांचे नियोजन केले.

सुरेश कबाडे यांनी आपल्या ऊसाला खतांची मात्रा सुनियोजित पद्धतीने दिली. रोप सेट झाल्यानंतर 20 दिवसांनी पहिला डोस एकरी दिला. तसेच एकरी 4 किलो खोडकिडीसाठी क्लारॉइन्ट्रोल टाकले. लावण केल्यापासून 15 दिवसांनी ते 45 दिवसापर्यत आठवड्यातून एकदा असे 4 वेळा खते ड्रीप मधून एकरी सोडली. याशिवाय 91-180 दिवसापर्यंत प्रत्येक आठवड्यातून एकदा असे 12 वेळा खते ड्रीपमधून एकरी सोडली. रोप लावणीनंतर 105 दिवसांनी मोठी बांधणी केली. त्यावेळी योग्य खतांची मात्रा दिली. तसेच एकरी 4 किलो खीडकिडीसाठी क्लारॉइन्ट्रों टाकले. नंतर 180-300दिवसापर्यंत प्रत्येक आठवड्यात एकदा असे 18 वेळा खते ड्रीप मधून सोडली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here