महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर

328

वर्धा: ठाकरे सरकारने ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज 2 लाख रुपयांपर्यंतचं आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा नागपूरमध्ये पहिल्या अधिवेशनात केली होती. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 24 फेब्रुवारीला कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली होती. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर झाली आहे.

याआधी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत 68 गावांतील 15358 शेतकऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा यामध्ये समावेश होता. दुसऱ्या यादीत वर्धा जिल्ह्यातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. वर्ध्यातील पहिल्या यादीत दोन गावांतील 166 शेतकऱ्यांचा समावेश होता. यापैकी 154 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. उर्वरित 12 पैकी 8 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण न झाल्याने तर चार शेतकरी मृत आल्याने सध्या लाभापासून वंचित आहे.

आधार ऑथेंटिकेशन न झालेले शेतकरी आधार नंबर बँक अपलोड करेल किंवा कोण याबाबत चर्चा सुरु आहे. तर 154 शेतकऱ्यांपैकी 112 शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 5 लाख 94 हजार रुपये जमा झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात 61084 लाभार्थी शेतकऱ्यां यापैकी 57 हजार 733 शेतकऱ्यांचे आधार अपडेट आहे. तर 11 हजार 143 शेतकऱ्यांची यादी अद्यापही बाकी आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, “आत्तापर्यंत सरकारकडे 35 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती आली आहे. त्यावर काम सुरु झालं आहे. टप्प्याटप्प्याने ही यादी जाहीर केली जाईल. यात पूर्ण पारदर्शकता असेल.”

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here