शेतकऱ्यांच्या अर्थिक गरजेसाठी किसान प्रगती कार्ड

मुंबई : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने शेतकऱ्यांची पतगरज पूर्ण करण्यासाठी किसान प्रगती कार्डची (केपीसी) सुविधा सुरू केली आहे. या माध्यमातून वैयक्तिक अपघात विमा योजनेचे लाभही मिळतील. वार्षिक नूतनीकरण पर्यायासह ५ वर्षांच्या मुदतीसाठी १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केपीसीद्वारे मिळू शकेल, अशी माहिती या बँकेचे मुख्य व्यवसाय अधिकारी संजय काव यांनी दिली.

अल्पभूधारक शेतकऱ्यांंना पीक उत्पादन, कापणीपूर्व आणि कापणीनंतरच्या काळात आर्थिक गरज असते. तसेच, शेती मालमत्तेच्या देखभालीसाठीचे भांडवल आणि इतर किरकोळ खर्चाकरिताही निधीची निकड भासते. हे लक्षात घेऊन उज्जीवन बँकेने हे कार्ड सुरू केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here