15 एकर ऊस आगीत जळून खाक, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

120

ढवारसी, उत्तर प्रदेश: शेतकर्‍याच्या 15 एकर ऊसाच्या पीकामध्ये हायपावर लाईन च्या तारांमधून बाहेर पडलेल्या ठिणगीमुळे आग लागली. ज्यामुळे संपूर्ण पीक जळून राख झाले.

शेतकरी जगतवीर सिंह यांच्या 15 एकर शेतामध्ये ऊसाचे पीक आहे. शेतकर्‍याने सांगितल्यानुसार, पीकाच्या वरुन हाईटेंशन लाइन गेली आहे. लाइन च्या तारा अधिक सैल झाल्याने त्या एकमेकांवर आदळल्या. त्यातून निघालेल्या ठिणगीमुळे ऊस पीकामध्ये आग लागली. मोठ्या प्रयत्नानंतरही शेतकरी आपल्या ऊसाला जळण्यापासून वाचवू शकला नाही. बघता बघता ऊसाचे पीक़ जळून खाक झाले. शेतकर्‍याने खराब लाइन बदलण्यासाठी विज विभागामध्ये अनेकदा तक्रार नोंदवली होती पण विभागाकडून या तारा बदलण्यात आल्या नव्हत्या.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here