साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन

चेन्नई : तामीळनाडू ऊस उत्पादक संघाच्या (Tamil Nadu Sugarcane Farmers Association) सुमारे १०० सदस्यांनी सलग नवव्या दिवशी अलंगनल्लूर येथील राष्ट्रीय राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ऊस गाळप सुरू करण्याची मागणी करत आंदोलन सुरू ठेवले. संघाचे प्रदेश अध्यक्ष एन. पलानीसामी यांनी सांगितले की, यावर्षी सुमारे ६०,००० टनाहून अधिक ऊसाची नोंदणी झाली आहे. इतर १५,००० टन नोंदणी न झालेला ऊस अलंगनल्लूर, शोलावंदन, वाडीपट्टी, मेलूर, चैक्कानूरानी, निलकोत्तई आणि अरुपपुकोत्तई येथील ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे.

Thehindu.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, पलानीसामी यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षात येथे उत्पादित करण्यात आलेला ऊस पेराम्बलूर, तंजावुर आणि उडुमालपेट येथील कारखान्याला पाठविण्यात आला होता. संघाने यापूर्वी वाणिज्य कर मंत्री पी. मूर्ती आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसमोरही हा प्रश्न मांडला होता. पलानीसामी यांनी सांगितले की, सरकारने कारखान्यात त्वरीत गाळप सुरू करण्याची घोषणा केली पाहिजे. डीएमकेने निवडणुकीवेळी हा कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. ऊस गाळप सुरू करण्यासाठी कारखान्याला १० कोटी रुपयांची गरज आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here