साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

गोहाना : आहुलाना येथील चौ. सहकारी साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांनी भारतीय किसान युनीयनच्या बॅनरखाली आंदोलन केले. कारखाना प्रशासनाकडून साफ ऊस आणण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. याबाबत भाकियूच्या नेत्यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालकांच्या नावे असलेलेल निवेदन कार्यालयात दिले.

आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भाकियूचे जिल्हाध्यक्ष अशोक लठवाल यांनी सांगितले की, शेतकरी मजुरांकडून उसाचे तोडणी व सफाई करून तो साखर कारखान्याकडे आणतात. शेतकऱ्यांना ऊस तोडणी, सोलणीसाठी प्रती क्विंटल ४५ ते ५० रुपये मजुरी द्यावी लागत आहे. एवढे करूनही कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांना साफ ऊस आणावा असे सांगत त्रास दिला जात आहे. शेतकरी ऊस साफ करून पाठवत नाहीत असे जर कारखान्याला वाटत असेल तर शेतकरी ऊस तोडणी, साफ करण्याचे पैसे कारखान्याला देतील. मग कारखान्याने आपल्याकडील कामगारांकडून ऊस साफ करून घ्यावा अशी भूमिकाही शेतकऱ्यांनी मांडली.

यावेळी कारखान्याने शेतकऱ्यांना चांगली औषधे व किटकनाशकांचा पुरवठा केला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी कृष्ण मलिक, संजय, सोनू, संदीप, जसमेर, जितेंद्र, बिजेंद्र, कृष्ण, दिनेश, पवन, प्रदीप आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here