थकीत ऊस बिलासाठी नारायणगड साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

शहजादपूर : बनोंदीच्या नारायणगड साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील कोट्यवधी रुपयांची ऊस बिले दिलेली नाहीत. त्यामुळे गेल्या १४ दिवसांपासून धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आम आदमी पक्षाने पाठिंबा दिला आहे.
शेतकऱ्यांच्या २१ सदस्यांच्या समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात आम आदमी पक्षाच्या शेतकरी विभागाचे हरियाणा प्रदेश प्रभारी गजेंद्र सिंह यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी प्रदेश प्रभारी गजेंद्र सिंह म्हणाले, शेतकऱ्यांचे सर्वत्र शोषण सुरू आहे. नारायणगड साखर कारखान्याशी संलग्न शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या शेतकऱ्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी फी भरणेही अशक्य झाले आहे.

सरकार आणि कारखाना प्रशासन या वस्तूस्थितीकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप सिंह यांनी केला. जर एका आठवड्यात शेतकऱ्यांना ऊस बिले मिळाली नाहीत, तर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, प्रदेश प्रभारी सुशील गुप्ता यांच्याची चर्चा करून पुढील ठोस रणनीती तयार केली जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी ताज मोहम्मद, सुरेंद्र सिंह, सुधीर राणा, मास्टर एमेश, सुरेंद्र आर्य, राम कुमार, दिनेश वालिया आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here