महाराष्ट्रात ऊस आणि इतर पिकांच्या प्रश्नांबाबत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू

औरंगाबाद : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलन सुरू केल आहे. आणि या आंदोलनाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे गाव आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्ये उभा आहे, त्यांना प्रती हेक्टर २ लाख रुपये आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये मदत जाहीर करावी यासह इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

यापूर्वी २०१७ मध्ये पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोधी आंदोलन केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा गदारोळ निर्माण झाला होता.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून हे आंदोलन सुरू झाले. ते ५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या आंदोलनाबाबत सरपंच धनंजय धनवटे यांनी सांगितले की, जर सरकारने आमच्या मागण्यांबाबत काहीच उत्तर दिले नाही, तर आंदोलन तीव्र केले जाईल. ते म्हणाले, निफाडमध्ये (नाशिक) आणि कोपरगाव (अहमदनगर) अशा आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. आंदोलनतकर्त्यांनी बुधवारी सकाळी गावातून फेरी काढून आंदोलन सुरू केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here