लॉकडाउन काळात शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीला परवानगी

133

मुजफ्फरनगर(उत्तरप्रदेश) : देशात कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर फार मोठा दुष्परिणाम झाला आहे. शेती आणि शेतकऱ्यांनाही कोरोना मुळे असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हवामानानेही शेतकऱ्यांना चांगली साथ दिली नाही. शेतकऱ्यांची ऊसतोडणी सुरु आहे पण सतत सुरु असणाऱ्या पावसाने त्यांच्या अडचणीत भरच टाकली आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांवरही लॉक डाउन चा मोठा परिणाम होत आहे. अशी परिस्थीती पाहता प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांना पीक कापणीसाठी सूट दिली आहे.

याबाबत बोलताना केन्द्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री नरेन्द्र सिंह तोमर म्हणाले, शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात कापणी करावी. तो माल बाजारात विकावा. सरकारने शेतकऱ्यांना ही सवलत दिली आहे. ऊस शेतकऱ्यांबाबत बोलताना मंत्री म्हणाले, ऊस शेतकरी ही कोणत्याही अडथळ्याशिवाय ऊस तोडणी करू शकतात आणि साखर कारखान्यांमध्ये घेऊन जाऊ शकतात. कृषी मंत्री म्हणाले, ऊस शेतकरी ऊस घेऊन जात असताना लॉक डाऊनमुळे त्यांचा ऊस ट्रॅक्टर ट्रॉली मध्येच राहीला. पण आता सरकारने शेतकऱ्यांना सवलत दिली आहे. यामुळे उत्तर प्रदेश सारख्या मोठया ऊस उत्पादक राज्यामध्ये कारखान्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. ऊस पुरवठा बंद झाल्यामुळे बरेच कारखाने बंद होत ते आता पुन्हा सुरु होतील. यामुळे ऊस शेतकरी आणि साखर कारखान्यांना अर्थिक फायदा होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here