उसाची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांसह साखर कारखानदार चिंतेत

सोलापूर : जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने हजारो हेक्टरवरील ऊस पाण्याअभावी जळून गेला आहे. उसाची वाढ खुंटल्याने उतारा घसरण्याची चिन्हे आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांनाही बसण्याची चिन्हे आहेत. काही शेतकऱ्यांनी ऊस वाळून जाण्याएवजी जनावरांना चाऱ्यासाठी विकत आहेत. त्यामुळे उसाची टंचाई होण्याची शक्यता असून साखर कारखानदारांना ऊस मिळविण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.

ऊस पिकासाठी वर्षभर महागडी खते, औषधे-किटकनाशक फवारणी व मशागतीसाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत. मात्र, उत्पादन घटणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दरवर्षी किमान २५ ते ३५ कांड्या असलेला ऊस यंदा केवळ दहा कांड्यांपर्यंत आहे. वाढ खुंटल्याने उतारा यंदा घसरणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात दुष्काळाचे सावट गडद होत चालले आहे. त्यामुळे तत्काळ चारा छावण्या सुरु कराव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे. याप्रश्नी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना काही साखर कारखानदार, संघटनानी निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here