साखर कारखान्याचे गाळप पूर्ण क्षमतेने न झाल्याने शेतकरी संतप्त

94

कर्नाल : साखर कारखाना पूर्ण क्षेमतेने गाळप करीत नाही. आणि इतर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना येथे ऊस विकण्याची परवानगी दिल्यामुळे नाराज झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी कर्नाल सहकारी साखर कारखान्यात गोंधळ घातला. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी याचे उद्घाटन केले.होते. त्यावेळी कारखान्याची गाळप क्षमता २२०० टीडीसीवरुन ३५०० टन प्रती दिन करण्यात आली आहे. हा गाळप ३५०० टीडीसी गाळप करीत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सध्या कारखाना २५०० टीडीसीने चालवला जात आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

Tribuneindia.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, यादरम्यान करनाल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक आदिती यांनी सांगितले की यंत्रातून विजेचे वहन केले जात नसल्याने कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. विजेच्या पुरवठ्यासाठी १३२ केव्ही लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, काही आरओडब्ल्यू नियमांमुळे कामात अडथळे येत आहेत. प्लांट ३००० टीसीडी क्षमतेने सुरू असून तो हळूहळू वाढवला जात असल्याचे त्यांनी सांगितले. इतर जिल्ह्यातील ऊस तोडणीस येत असल्याबद्दल विचारणा केल्यानंतर त्या म्हणाल्या, आम्ही कार्यक्षेत्रातील उत्पदाकांसाठी तोडणी कार्यक्रम जारी केला आहे. काहींनी आपले नातेवाई आणि इतर लोकांना यात संधी दिली आहे. आमच्याकडे कम्प्युटराइज्ड तोडणी कार्यक्रम आहे. नियमांचे पालन केले जात आहे. शेतकऱ्यांना मागणीनुसार तोडणी दिली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here