ऊस दर जाहीर न झाल्याने शेतकरी संतप्त

रुडकी : राज्य सरकारने अद्याप ऊस दर जाहीर न केल्याबद्दल उत्तराखंड किसान मोर्चाने संताप व्यक्त केला आहे. लवकरात लवकर दर जाहीर न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रशासकीय भवानात आयोजित उत्तराखंड किसान मोर्चाच्या मासिक बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष गुलशन रोड यांनी सांगितले की, देशातील सर्व राज्यांनी ऊस दर जाहीर केला आहे. मात्र एकमेव उत्तराखंडने अद्याप दर जाहीर केलेला नाही. गळीत हंगाम सुरू होणार असून सरकार जाणूनबुजून दर जाहीर करण्यास टाळाटाळ करीत आहे. राज्यात ऊस वाहतुकीसाठी अधिक पैसे आकारले जातात. त्यात बदल करून ते उत्तर प्रदेशप्रमाणे करावेत. धर्मवीर प्रधान यांनी सांगितले की, लिब्बरहेडी साखर कारखाना परिसरातील रस्ते, बोगद्याची कामे गतीने करण्याची गरज आहे. भाताच्या खरेदीत मनमानी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची गरज आहे.

यावेळी सुरेंद्र, आकिल हसन, नरेश लौहान, सतबीर प्रधान, जोनी कुमार, सुलेमान, जय सिंह प्रधान, विपिन कुमार, दानिश, पप्पू भाटिया, विरेंद्र सैनी आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here