शेतकरी स्वत: खरेदी करणार साखर

झबरेड़ा: कोणताही व्यापारी जर साखर खरेदी करणार नसेल तर, ती साखर आंम्ही स्वत: खरेदी करु, असा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला. झबरेडा येथील साबतवाली गावात झालेल्या शेतकरी क्लबच्या बैठकीत ते बोलत होते. क्लबचे अध्यक्ष चौधरी कटार सिंह म्हणाले, प्रशासनाच्या वतीने इकबालपूर साखर कारखान्याची साखर 3100 रुपये प्रति क्विंटल दराने लिलावात काढण्याची घोषणा केली गेली आहे. याबाबत सर्वच शेतकरी अनभिज्ञ होते. साखरेच्या लिलावाची बातमी समजल्यानंतर कटार सिंह यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना परवडणार्‍या दरात व्यापार्‍यांनी ही साखर खरेदी करावी, जर कुठला व्यापारी ही साखर खरेदी करायला तयार नसेल, तर शेतकरी स्वत: साखर खरेदी करतील. सरकारच्या लिलाव प्रक्रियेत शेतकर्‍यांचाही सहभाग असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपण आपल्या कष्टाने पिकवलेली साखर कमी दरात कुठल्याही व्यापार्‍याला दिली जावू नये यासाठी शेतकर्‍यांनीही या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इकबालपूर कारखान्याची साखर आता शेतकरी स्वत: खरेदी करतील.

या बैठकीला अशोक कुमार, मेनपाल, सतीश कुमार, विजेंद्र सिंह कंवरपाल, प्रमोद सिंह, तेजपाल, राजीव जमशेद, ओम कुमार, सुभाष कुमार, किशन सिंह आणि साधु राम आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here