शाहजहाँपूर : शेतकरी वर्षाला कमवताहेत १.९७ लाख रुपये, ऊस विभागाने केली आर्थिक गणना

39

शाहजहाँपूर : शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची पडताळणी करण्यासाठी ऊस विकास विभागाने आर्थिक गणना केली आहे. जिल्ह्यात प्रती शेतकरी एकरी १ लाख ९७ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची गणना करण्यात आली आहे. तर प्रती शेतकरी सरासरी जमीन १.२१७ हेक्टर तथा उसाचे क्षेत्र ०.८३१ हेक्टर असल्याचे आढळले आहे. अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी मे महिन्यात आर्थिक गणनेचे निर्देश दिले होते. जिल्ह्यात ३२ पथकांनी आर्थिक गणना केली आहे. याबाबत प्रत्येक ऊस विकास परिषदेत अहवाल सादर करण्यात आला आहे.

याबाबत जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. खुशीराम यांनी अप्पर मुख्य सचिवांना अहवाल पाठवला आहे. प्रत्येक ऊस विकास परिषदेने आठ गावांची निवड करून त्यातील ५० शेतकऱ्यांशी चर्चा करून आर्थिक स्थितीचे आकलन केले आहे. अशा पद्धतीने जिल्ह्यातील चार ऊस विकास परिषदांच्यावतीने ३२ गावांतील १६०० शेतकऱ्यांचा सर्व्हे करून आढावा घेण्यात आला. अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, २०१७-१८ मध्ये प्रतिकात्मक रुपात सर्व्हे करण्यात आला होता. पाच वर्षात प्रती शेतकरी ७० हजार रुपयांची वाढ उत्पन्नात झाली आहे. या अहवालानुसार रोजा ऊस शेतकरी परिषदेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी जिल्ह्यात सर्वात संपन्न असल्याचे आढळून आले आहे. येथे प्रती शेतकरी ऊस लागवड क्षेत्रही अधिक आहे. पुवायामध्ये सरासरी उत्पन्न प्रती शेतकरी ४२००० रुपये आढळले आहे. तिलहर येथील शेतकरी कमाईत तिसऱ्या तर निगोहीतील शेतकरी चौथ्या स्थानावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here