शेतकऱ्यांना स्मार्ट गन्ना किसान वेबसाईटवर एका क्लिकमध्ये मिळतेय सुविधा

लखनौ : आता ऊस उत्पादक शेतकरी आपल्या जमिनीविषयीची सर्व माहिती एका क्लिकवर पाहू शकेल. स्मार्ट किसान वेबसाईट (enquiry.caneup.in) च्या माध्यमातून गाववार नोंद झालेल्या जमिनींचा गोषवारा शेतकरी मिळवू शकतात. जर एखादा गट क्रमांक या नोंदीमध्ये नसेल तर ऊस पर्यवेक्षकांच्या मदतीने दहा दिवसांत त्याची नव्याने नोंदणी करता येईल. ऊस तथा साखर आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, या नोंदीच्या आधारावर ऊसाची तोडणी निश्चित केली जाईल. त्यावरच शेतकऱ्यांकडून किती ऊस खरेदी केला जाईल, हेही ठरणार आहे.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, वेबसाईटच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षातील ऊस पुरवठ्याची आकडेवारी मिळू शकते. शेतकऱ्यांना ऊसाचे लागवड क्षेत्र, महसूल अभिलेख आदींची माहिती मिळेल. एका पाहणी २० टक्के शेतकऱ्यांचे क्षेत्र अधिक असल्याचे आढळले होते. अशा त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ग्रामीण समित्यांच्या स्तरावर नियोजन करण्यात आले. त्यानंतरही काही शेतकरी या पासून वंचित राहिले आहेत. काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे घोषणापत्र भरायचे राहिले असेल तर त्यांच्यासाठी तीन नोव्हेंबर २०२२ अशी तारीख निश्चिती केली आहे. असे शेतकरी १५ टक्के असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here