या कारणामुळे शेतकरी पिकवताहेत ऊसाऐवजी केळी

मेरठ : केळाच्या पिकात भरपूर नफा असल्याचे लक्षात आल्यानंतर पश्‍चिमी यूपी मधील शेतकरी ऊसाऐवजी केळी पिकवत आहेत. या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी फळांचे पीक घेणे सुरु केले आहे. टिशू कल्चर पद्धतीने विकसित केल्या जाणार्‍या केळाच्या रोपांनी ते प्रभावीत झाले आहेत.

सरदार वल्लभभाई पटेल कृषि विश्‍वविद्यालय (एसव्हीबीपीएयू) ने कृषि जैव प्रौद्योगिकी चे प्राध्यापक आर.एस. सेंगर म्हणाले की, केळाच्या पिकापासून मिळणारा नफा ऊसाच्या तुलनेत दुप्पट आहे. या नफ्यासाठी या परिसरातील शेतकरी केळी पिकवत आहेत. लवकरच संपूर्ण क्षेत्रात फळांची आणि केळांची लागवड होईल, कारण या पिकांना भरपूर मागणी आहे आणि त्यात फायदाही आहे.

सध्या, मेरठ, मुजफ्फरनगर आणि बिजनौर मध्ये 250 हेक्टरमध्ये केळांची शेती केली जात आहे. कृषि विश्‍वविद्यालय ने टिशू कल्चर पद्धतीने ग्रैंड नाईन (जी 9) नावाच्या विशेष प्रकारची रोगमुक्त केळांची रोपे विकसित केली आहेत. याला पारंपारिक प्रकारांसमोर विकसित होण्यासाठी कमी वेळ लागतो. या वैविध्यामुळे शेतकर्‍यांना कार्बोहायड्रेट असणारी भरपूर फळांची लागवड करण्यासाठी प्रेरित करण्यात आले, जी ऊसाच्या तुलनेत दुप्पटेपेक्षाही अधिक उत्पन्न देते.

सेंगर म्हणाले, महाराष्ट्र अनेक दशकांपासून केळाची शेती करतो. इथली केळी पूर्ण देशात पाठवली जातात. उत्तर प्रदेशातील महाराजगंज, लखनौ आणि सीतापूर सारख्या काही पूर्वी जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात केळांची वृलागवड करण्यात येतआहे. पश्‍चिमी यूपी च्या शेतकर्‍यांमध्ये ऊस पीकास पसंती आहे, पण आता दोन वर्षांपासून ते केळांची शेती करत आहेत

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here