ऊस पिकावरील रोगामुळे शेतकरी हवालदिल

सहारनपूर : ऊस पिकावर आलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृषीतज्ज्ञांची कमतरता असल्याने पिकांवर औषध फवारणी करताना योग्य सल्ला मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
भागात ऊस हेच मुख्य पिक आहे. तालुक्यात ७० टक्के क्षेत्रात ऊस पिक आहे. यमुनेच्या परिसरात शेतकऱ्यांनी जवळपास ९० टक्के शेतीमध्ये ऊस पिकवला आहे. मात्र, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना उसावरील रोगांवर औषध फवारण्यासाठी बाजारातील शेती सेवा केंद्रातील विक्रेत्यांच्या सल्ल्याने किटकनाशके घ्यावी लागत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना प्रचंड खर्च सोसावा लागत आहे. शिवाय, इतका खर्च करुनही अपेक्षीत उपचार केले जात नाहीत अशी स्थिती आहे.

शेती केंद्रातील विक्रेत्यांच्या सल्ल्यानुसार, शेतकऱ्यांना किकनाशके खरेदी करावी लागतात. त्यातून पैशांची लूट होते असा शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा अनुभव आहे. गेल्या १५ दिवसांपासून ऊस पिकावरील सुंडी (अर्लीसूट बोरर) रोगाने थैमान घातले आहे. शिवाय, पोक्का बोईंग, लिस्पोट कीट, स्मर्ट रोगाचा प्रादुर्भाव आहे. कृषी विशेषज्ज्ञ बिरेंद्र कुमार सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ली सूट बोरर किटकांपासून बचावासाठी कार्बोफ्यूरान अथवा कार्टप हाइड्रोक्लो हे १२ किलो औषध प्रती एकर फवारावे लागते. पोक्का बोईंग वर टेंगूकेनाजोल व कार्बाडायझेन अर्धा किलो प्रती एकर आवश्यक आहे. तर ली स्पोट म्हणजे फंगसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड अर्धा किलो प्रती एकर फवारण्याची गरज आहे.

शेतकरी मांगेराम, विकास कुमार, देवराज शर्मा आणि महिपाल सिंह चौधरी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळत नसल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने कृषी तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची गरज आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here