शेतात ऊस शिल्लक असल्याने शेतकरी हवालदिल

202

बागपत : एप्रिल महिना संपत आला असून साखर कारखानेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीत अनेक शेतकऱ्यांच्या शेतामंध्ये खूप ऊस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. कारखान्यांना मंजूर झालेला ऊस खरेदी केल्यानंतरही जवळपास २० लाख क्विंटल शिल्लक राहाणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
बागपत येथील १.२६ लाख शेतकऱ्यांनी पिकवलेला ४.०१ कोटी क्विंटल ऊस सहा जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांना वितरीत केला जातो. आतापर्यंत ३.५ कोटी क्विंटल ऊस खरेदी करण्यात आला आहे. त्यामध्ये बागपतमधील तिन साखर कारखान्यंनी २.४० कोटी क्विंटल आणि उर्वरीत ऊस इतर जिल्ह्यातील कारखान्यांनी खरेदी केला आहे.
मंजूर कोट्यापेक्षा अधिक ऊस विकण्यासाठी शेतकरी साखर कारखान्यांना अतिरिक्त ऊस खरेदीसाठी करार करण्याच्या प्रयत्नात आहेत. दर कारखान्यांनी ऊस खरेदी केला नाही, तर त्याचे काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

दोनच कारखान्यांचा पर्याय
किनौनी साखर कारखान्याने बागपतच्या शेतकऱ्यांचा अतिरिक्त ऊस खरेदी करण्यासाठी ३ लाख क्विंटलचा करार केला आहे तर मोदीनगर साखर कारखान्याने १.५ लाख क्विंटलचा करार केला आहे. दरम्यान, साकरौद गावातील रजनपाल सिंह फौजी यांनी बागपत सहकारी ऊस विकास समितीशी चर्चा केली. साखर कारखान्याकडे मंजूर कोट्यापेक्षा ५०० क्विंटल अधिक ऊस शिल्लक असल्याचे सांगितले. मात्र, शेतकऱ्यांना गुऱ्हाळांना २५० ते २६० रुपये क्विंटल दराने ऊस विकावा लागत आहे. साखर कारखान्यांकडून मात्र ३२५ रुपये दर मिळतो.

ऊस पेटविण्याचा इशारा
बावली गावातील शेतकरी विनोद यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. अमरपाल आणि सुखबीर यांच्या शेतात ऊस शिल्लक आहे. या शेतकऱ्यांचा बेसिक कोटा संपला आहे. आता अतिरिक्त ऊस खरेदीचा करार झाला नाही तर शेतकऱ्यांना ऊस पेटवावा लागेल असे यामध्ये म्हटले होते. दरम्यान, तिन्ही कारखान्यांकडे ५८४ कोटी रुपयंची थकबाकी आहे. बागपत, रमाला आणि मलकपूर या कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांचा ऊस खरेदी झाल्यानंतरच कारखाने बंद होतील असे वरिष्ठ ऊस विकास निरीक्षक अनिल कुमार यांनी सांगितले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here