ऊस बिल न मिळाल्याने शेतकरी हवालदिल

172

सहारनपूर : जडौदापांडा येथे उसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विभागातील शेतकऱ्यांनी लवकर पैसे मिळावेत अशी मागणी केली आहे.

विभागातील जडौदापांडा, मोरा, कातला, झबीरन, मुश्कीपुर, भटपुरा, उमरीमजबता, बालूमाजरा, हसनपूर लोटनी आदी गावांतील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास सहा महिने उलटले आहेत. मात्र, नानौता साखर कारखान्याने आतापर्यंत उसचे पूर्ण बिल दिलेले नाही.

मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन जानेवारीपर्यंतचे पैसे मिळाले आहेत. तर देवबंद साखर कारखान्याने उसाचे मार्च पर्यंतचे पैसे दिले आहेत. विभागातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पैसे देण्याची मागणी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here