ऊस दरासाठी शेतकऱ्यांचा मुख्य ऊस अधिकाऱ्यांना घेराव

67

बाजपूर : ऊस बिलांसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या प्रशासकीय भवनात मुख्य ऊस अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी विविध मागण्यांची पूर्तता न केल्यास आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला.
सोमवारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय भवनात पोहोचले. तेथे त्यांनी कार्यकारी संचालकांच्या अनुपस्थितीत मुख्य ऊस अधिकारी डॉ. राजीव अरोरा यांना घेराव घातला. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन एक महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. कारखान्याला ३१ कोटी रुपयांचा ऊस पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. कारखान्याच्या व्यवस्थापनातही गोंधळ आहे. अनेकवेळा कारखाना बंद पडत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जर कारखान्याने वेळेवर ऊस बिले दिली नाहीत तर आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी उत्तराखंड शुगर फेडरेशनचे कार्यकारी संचालक उदयराज सिंह यांनी फोनवर शेतकऱ्यांशी चर्चा केली. तीन ते चार दिवसांत बिले देण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाकियूचे जिल्हा उपाध्यक्ष बिजेंद्र सिंह डोगरा, बलदेव सिंह नामधारी, जसवीर सिंह भुल्लर, सुनील डोगरा, अमृतपाल सिंह, गुरप्रीत सिंह, प्रीतपाल शर्मा, राणा रणजोत सिंह, जगमोहन सिंह, हरमीत सिंह नोनू, सुरेंद्र शर्मा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here