कर्नाटक विधान भवनाला शेतकऱ्यांचा ऊस दरासाठी ५ ऑक्टोबरला घेराव

मैसूर : कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ५ ऑक्टोबरला बेंगळुरूमध्ये विधानभवनाला घेराव घालण्याचे आंदोलन करण्याचे ठरवले आहे. केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये २८५० रुपयांवरुन २९०० रुपयाची किरकोळ वाढ केल्याचा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यानंतर आता एफआरपीत फेरबदल करण्यासाठी शेतकऱ्यांनी दबाव वाढवला आहे. केंद्र सरकारने अलीकडेच १० टक्के साखर उताऱ्यासाठी ऊस दर २९०० रुपये प्रती टन निश्चित केला. कर्नाटक ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरबुर शांताकुमार यांनी ही ऊस दरवाढ किरकोळ असल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकार एफआरपी २९०० रुपये प्रती टन निश्चित करण्यामागील आपली भूमिका सांगितली पाहिजे असे शांता कुमार यांनी सांगितले. उसाच्या उत्पादन खर्च प्रती टन ३२०० रुपये येतो, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी कामगारांचा खर्च, खतांवर होणारा खर्च आणि वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या सतत झालेल्या दरवाढीनंतर अवैज्ञानिक पद्धतीने एफआरपी निश्चित केल्याचा आरोप करत शांता कुमार यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, केंद्र सरकारने एफआरपी ३,५०० रुपये प्रती टन करण्याची गरज आहे. कर्नाटकच्या विविध भागातून शेतकरी बेंगळुरूमध्ये एकत्र येतील आणि ५ ऑगस्टला केंद्र सरकारवर दबाव वाढविण्यासाठी विधानभवानाला घेराव घालतील असे कुमार यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here