बागपत : पुसार-बरनावा रस्त्यावर पुसार गावाजवळच्या जंगलातून गेलेल्या अतिउच्च दाबाच्या विजेच्या तारांतील ठिगणी पडून उसाला आग लागली. याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी आगीवर कसेबसे नियंत्रण मिळवले. दरम्यान, तीन शेतकऱ्यांचा सुमारे सहा एकरांतील ऊस जळून खाक झाला. संतप्त शेतकऱ्यांनी पॉवर कॉर्पोरेशन समोर गोंधळ घातला.
पुसार-बरनवा रस्त्यावर पुसार येथील मनोज आणि प्रदीप यांच्या शेतावरून जाणाऱ्या अतिउच्च दाबाच्या विजेच्या तारांमधून ठिणग्या पडून आग लागली. आग हळूहळू जगमेहेर यांच्या शेतात पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी धाव घेऊन पाणी, माती टाकून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत सहा एकर ऊस जळाला.
संतप्त शेतकऱ्यांनी पॉवर कॉर्पोरेशन समोर जोरदार गोंधळ घातला. अतिउच्च दाबाच्या विजेच्या तारा सैल असल्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यापूर्वीही तक्रार करून दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात आले. यावेळी नीरज, प्रदीप, रुपेश, सचिन, राजन, मुकेश, नबाबसिंह, कालू, देवेंद्र आदी शेतकरी उपस्थित होते.