सरकारने माय शुगर कारखाना चालविण्याची शेतकऱ्यांची मागणी

मंड्या : सरकारने माय शुगर कारखाना चालवावा या मागणीसाठी मंड्या जिल्हा रयत हितरक्षण समितीच्या बॅनरखाली शेतकऱ्यांनी सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी बेंगळुरूमधील साखर आयुक्त कार्यालय तसेच मंड्यामधील ऊस संशोधन केंद्र कोणत्याही परिस्थितीत बेळगावला स्थलांतरीत करू नये अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात कारखाना सरकारने चालविण्याबाबत घोषणा केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, जर सरकारकडून माय शुगर मिल पुन्हा सुरू करण्याबाबत घोषणा केली गेली नही अथवा निर्णय घेतला गेला नाही तर शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू करतील असा इशारा देण्यात आला. आमदार के. टी. श्रीकांत गौडा आणि एन. अप्पाजीगौडा, केपीसीसी सदस्य एम. डी. जयराम, शेतकरी नेते सुनंदा जयराम, सीटूचे नेते सी. कुमारी यांसह विविध संघटनांच्या नेत्यांनी या आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला. विविध संघटनांचे कार्यकर्ते, शेतकरी आंदोलनात सामिल झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here