कोरोना वायरस शी लढण्यासाठी शेतकर्‍यांची साखर कारखान्यांकडे हँन्ड सॅनिटायजरची मागणी

128

म्हैसूर(कर्नाटक): कोरोना वायरस शी लढण्यासाठी  लागणाऱ्या  हॅन्ड सॅनिटायजरची  मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सहकारी साखर कारखाने आणि डिस्टीलरीज यांना हॅन्ड सॅनिटायजर च्या उत्पादनासाठी प्रोत्साहित करत आहे. शेतकर्‍यांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे कोरोनाच्या बचावासाठी हँन्ड सॅनिटायजर नाही. कर्नाटक राज्याच्या मांड्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे असे म्हणणे आहे की, सॅनिटायजरर्समुळेे लोकांना स्वच्छता आणि कोरोना च्या बचावासाठी जागृत केले जावू शकते.

मोठ्या शहरांमध्येही सॅनिटायजरची कमी आहे. मेडिकलच्या दुकानात सॅनिटायजर  चा साठा संपला आहे. काही केमिस्टनी अत्यंत काळजीपूर्वक याचे वितरण सुरु केले आहे.
कर्नाटकातील काही साखर कारखाने आणि डिस्टीलरीज मध्ये स्पिरीटचे उत्पादन बंद आहे. राज्य सरकारने हे ताबडतोब सुरु केले पाहिजे. तरच सॅनिटायजरचे उत्पादन होवू शकेल आणि गावात शेतकर्‍यांना ते तयार करुन दिले जाईल, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष के शांताकुमार म्हणाले की, साखर कारखान्यांनी सर्व जिल्ह्यात, रुग्णालयात आणि जनतेला सॅनिटायजर मोफत  उपलब्ध करावेत. राज्यातील ऊस उत्पादकांचे 20 लाख परिवार आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी साखर कारखान्यांकडून सॅनिटायजर, मास्क चे वितरण करणे आवश्यक आहे.

राज्याचे साखर आयुक्त अकरम पाशा म्हणाले की, दहा डिस्टिलरीज नी सॅनिटायजरचे उत्पादन सुरु केले आहे. ज्यामध्ये आठ डिस्टलरीजनी आबकारी विभागाकडून परवानगी घेतली आहे. त्यांनी सांगितले की, लवकरच सरकारच्या माध्यमातून सॅनिटायजर जिल्हा प्रशासन आणि इतर संघटनांपर्यंत पोचेल, की जेणेकरुन हे ग्रामीण भागात आणि गरीबांपर्यंंत पोहोचेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here