ऊसाची थकीत रक्कम त्वरीत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

रुद्रपूर : ऊसाचे पैसे मिळाले नसल्याने कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उप जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली कहाणी मांडली. त्यांनी लवकरात लवकर उसाचे पैसे देण्याबाबत मागणी केली.

ऊस युनियनचे माजी संचालक शिवदास सिंह, गोपाल गुप्त, सुरेश, आर. के. सिंह आदींनी सांगितले की, कोरोना काळात शेतकऱ्यांची कुटुंबे वाऱ्यावर आली आहेत. डिसेंबर महिन्याचेही उसाचे पैसे मिळालेले नाहीत. येथील शेतकरी प्रतापपूर साखर कारखान्याच्या ऊस काट्यावर वजन करण्यास गेले होते. अनेकदा कारखान्याच्या मालकांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी ऊस बिलांबाबत काहीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांची अवस्था दयनीय झाली आहे. पैसे नसल्याने शेतकऱ्यांना खरीप पेरणीत अडथळे आले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन उप जिल्हाधिकाऱ्यांना दिले. उप जिल्हाधिकारी संजीव कुमार उपाध्याय म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पैशांबाबत वरिष्ठ स्तरावर पत्र पाठवले जात आहे. ही समस्या सोडवली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here