ऊस दर ४५० रुपये क्विंटल करण्याची शेतकऱ्यांची मागणी

हसनपूर, उत्तर प्रदेश: पुढील गळीत हंगामात उसाचा दर किमान ४५० रुपये प्रती क्विंटल करावा आणि गेल्या हंगामातील थकीत ऊस बिले तातडीने मिळावीत अशी मागणी भारतीय किसान युनियनने केली.

भाकियूच्या भानू गटाची मासिक बैठक मंडईत झाली. साखर कारखान्यांनी नियमांनुसार चौदा दिवसांत उसाचे पैसे न दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. तालुका अध्यक्ष देवेंद्र सैनी म्हणाले, भू माफियांकडून आंब्याच्या बागांमध्ये केमिकलचा अधिक वापर केला जात आहे. आगामी काळात पर्यावरणासाठी हे धोकादायक ठरू शकते. अशा लोकांविरोधात कारवाईची गरज आहे. विभागात खाद्य तेलांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असून त्याला आळा घालण्याची गरज आहे. ऊस विभागाच्या घोषणापत्रासाठी ऑनलाईनची अट आहे. त्याऐवजी साखर कारखान्यांकडून ही प्रक्रिया करावी अशी मागणी करण्यात आली. रेशन दुकानांमध्ये कार्डधारकांना एक किलो कमी धान्य दिले जात आहे. अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याने दुकानदार गरीबांचे धान्य लुटत असल्याचा आरोप करण्यात आला.

शेतकऱ्यांना शेतीसाठी १८ तास वीज पुरवठा केला जावा अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी राजपाल सैनी, भरत राम, कैलाश सिंह, मनोज नागर, कमल सिंह ठाकूर, रोहित नागर, अमीचंद, मुरली सिंह व टेकचंद आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here