साखर कारखान्याचे ऊस खरेदी केंद्र बदलून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

शामली : सहकारी ऊस विकास समितीच्या वार्षिक बैठकीत सदस्यांनी ऊस संरक्षणाबाबत निवेदन सादर केले. या बैठकीत खोडसमा, सकोती, नाइनगला, उदपुर, मंगलोरा, म्यान कस्बा, कमालपूर, याहियापूर, सिंगरा येथील शेतकऱ्यांनी आपले ऊस खरेदी केंद्र शेरमऊ येथील उत्तम साखर कारखान्याला देण्याची मागणी करण्यात आली. समितीचे सचिव अजितकुमार सिंह अध्यक्षस्थानी होते.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊन साखर कारखान्याने पैसे न दिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. उसाचे पैसे न मिळाल्याने आम्ही आमचा ऊस उत्तम साखर कारखान्याला देणार आहोत असे शेतकऱ्यांनी सांगितले. तर काही शेतकऱ्यांनी आपला ऊस ऊन कारखान्याला देण्याची मागणी केली. या मागणीनंतर बराच वेळ गदारोळ झाला. नंतर बनावट स्वाक्षरी असलेले अर्ज सचिवांच्या आदेशाने काढून टाकण्यात आले. त्यानंतर शेतकरी शांत झाले. इतर सर्व प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले.

यावेळी साखर कारखान्याचे ऊस व्यवस्थापक कुलदीप पिलानिया, शेरमऊ साखर कारखान्याचे अधिकारी, समितीचे ऊस विकास निरीक्षक, माजी अध्यक्ष दिनेश गोयल, संचालक विदुर, राजेंद्र, समरपाल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here